Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

 

Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

  User ID :
 Password :
 forget Password?
  New user? Register

 

VIDEO GALLERY

Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

contact us

आश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी, दुर्गानवरात्रातील समाप्तीचा दिवस. दसरा हा भारतातील सार्वत्रिक सण आहे. सर्व जातीचे लोक हा सण साजरा करतात. हा विजयाचा, पराक्रमाचा सण आहे. अर्जुनाने अज्ञातवासामध्ये असताना शमीच्या ढोलीत ठेवलेली शस्त्रे काढून विराटाच्या गायी पळवणा~या कौरव सैन्यावर स्वारी केली व विजय मिळविला तो याच दिवशी. श्रीरामानी रावणावर विजय मिळविला व त्याचा वध केला तोही याच दिवशी म्हणूनच या दिवसाला विजयादशमी असे नाव पडले. प्राचीन काळापासून हा सण चालत आलेला आहे. प्रारंभी तो एक कृषिविषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेल्या शेतातले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव करीत असत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात व दस~याच्या दिवशी त्या धान्याचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात. या सर्व गोष्टी या उत्सवाचे मूळ कृषिस्वरुप व्यक्त करणा~या आहेत. कित्येक ठिकाणी भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. दस~याचा दिवस हा सर्व शुभ कार्यांना प्रशस्त मानतात. दशमी तिथी श्रवण नक्षत्राने युक्त असेल तर तो दिवस अति शुभ मानला जातो, म्हणूनच दस~याला साडेतीन शुभमुहूर्तापैकी एक मुहूर्त मानले आहे.