Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

 

Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

  User ID :
 Password :
 forget Password?
  New user? Register

 

VIDEO GALLERY

Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

contact us

नवरात्र हे एक काम्य व्रत आहे. पुष्कळ घराण्यात या व्रताला कुलाचाराचे स्वरुप असते. आश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो. त्यासाठी पवित्र जागी सोळा हातांचा मंडप उभारतात. तेथे एक वेदी तयार करतात. नंतर स्वस्तिवाचनपूर्वक त्या वेदीवर सिंहारुढ अष्टभुजा देवीची स्थापना करतात. मूर्ती नसल्यास नवार्ण यंत्राची स्थापना करतात. यंत्राशेजारी एक घट स्थापून त्याची व देवीची यथाविधी पूजा करतात. व्रताधारी व्यक्तीने नऊ दिवस उपास किंवा नक्तभोजन करुन व्रतस्थ राहायचे असते. आश्विन शुद्ध नवमी अखेरपर्यंत हे व्रत चालते. या व्रताला नऊ दिवस सप्तशतीचा पाठ करतात. अखंड दीप लावतात, घटावर एक किंवा रोज चढत्या क्रमाने माळा बांधतात. क्वचित होमहवन व बलीदानही करतात. नऊ दिवस रोज कुमारिकेचे पूजन करुन तीला भोजन घालतात. शेवटी स्थापित घर व देवी यांचे उत्थापन करतात. या व्रताची एक कथा सांगतात ती अशी, -- रावणाने सीतेचे हरण केल्यामुळे श्रीराम शोकग्रस्त झाले. मग त्यांच्या सांत्वनासाठी श्री नारद मुनी तेथे आले. त्यावेळी नारद मुनींनी श्रीरामांना सीतेच्या पूर्वजन्माची कथा पुढीलप्रमाणे निवेदन केली. " पूर्वजन्मी सीता ही मुनी कन्या होती. ती एकदा तप करत असताना रावणाच्या दृष्टीस पडली. रावण तिच्या रुपावर मोहित होऊन तीला म्हणाला तू माझी पत्नी हो. रावणाच्या या विनंतीचा सीतेने अव्हेर केला. त्यामुळे रावण चिडला व तीचे केस धरुन तीला फरफरट नेऊ लागला. त्याच्या या कृत्यामुळे सीता रागावली व तिने त्याला शाप दिला की तुझा नाश करण्यासाठी पुढच्या जन्मी मी अयोनिसंभव अशी स्त्री होईन. तीच ही आजची सीता व तुझी भार्या होय. ती आज लंकेतल्या अशोकवनात आहे. रावणाचा नाश केल्याशिवाय तू तीला परत आणू शकणार नाहीस. नंतर श्रीरामांच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने श्री नारदमुनींनी श्रीरामांना नवरात्र व्रत करावयास सांगितले. श्रीरामांनी ते केले. अष्टमीच्या मध्यरात्री देवीनी श्रीरामांना दर्शन देऊन तुझ्या हातून रावणाचा वध होईल असा आशीर्वाद दिला. नंतर श्रीरामांनी ते व्रत पूर्ण करुन दशमीच्या दिवशी स्वारी करण्यासाठी प्रस्थान ठेवले आणि शेवटी रावणाचा वध केला. देवीच्या शारदीय नवरात्राप्रमाणे रामकृष्ण, पांडुरंग, श्री दत्त, शाकंबरी, खंडोबा इ. देवतांची नवरात्रे ही साजरी केली जातात.