Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

 

Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

  User ID :
 Password :
 forget Password?
  New user? Register

 

VIDEO GALLERY

Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

contact us

हरितालिका व्रत-सौभाग्यप्राप्तीसाठी करावयाचे स्त्रियांचे एक व्रत. भाद्रपद शुद्ध तृतियेला हे व्रत करतात. व्रतविधी असा की पूजा स्थानासाठी कर्दळी स्तंभाचा मंडप करावा. ध्वज, पताका व तोरणे यांनी तो सुशोभित करावा. रंगीबेरंगी वस्त्रांनी त्यावर आच्छादन करुन सुगंधी द्रव्यांनी त्यावर विलेपन करावे. पूर्णकुंभ, दर्पण (आरसा), दीप व इतर मंगल वस्तू तेथे ठेवाव्यात. तीळ व आवळकाठीचे मिश्रण अंगाला लावून स्नान करावे. रेशमी वस्त्र परिधान करावे. सौभाग्य अलंकार घालून पुजास्थानी वाळूची किंवा मातीची पार्वतीची मूर्ती व शिवलिंगाची स्थापना करावी. मंगल वाद्यांच्या घोषात पूजेला सुरुवात करावी. व्रतसिद्धीसाठी दांपत्याची पूजा करुन त्यांना मंगल द्रव्ये घालून वायन द्यावे. स्त्रियांना सौभाग्य अलंकार व हळदी कूंकू द्यावे. त्यादिवशी अग्निला लागलेली कोणतीही वस्तू खाऊ पिऊ नये. केवळ फलाहार करावा. रात्री धुपारती, कथा श्रवण व जागरण करावे. दुस‌~या दिवशी सकाळी पंचोपचार पूजा करुन देवीला खिचडीचा नैवेद्य दाखवावा. मग अक्षता वाहून देवीचे विसर्जन करावे. फल - कन्यांना इच्छीत वर, अखंड सौभाग्य, आरोग्य व सुखसंपत्ती यांची प्राप्ती या व्रतामुळे मिळते.