Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

 

Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

  User ID :
 Password :
 forget Password?
  New user? Register

 

VIDEO GALLERY

Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

contact us

आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे व्यास पूजेचा दिवस आहे. संस्कृती घडविण्याचे काम वेगवेगळ्या ऋषींनी केले आहे. महर्षी व्यास हे जीवनाचे भाष्यकार आहेत कारण त्यांनी समग्र रुपात जीवन जाणलेले आहे. जीवन हा केवळ प्रकाश नाही किंवा केवळ अंधार नाही तर जीवन म्हणजे छाया-प्रकाशाचा लपंडाव, भरती-ओहोटीचा खेळ आणि सुख-दुःखांचा समन्वय आहे. व्यास हे समाजाचे खरे गुरु होते म्हणून परंपरागत व्यासपूजा ही गुरुपूजा मानली गेली व व्यास-पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी होऊ लागली. गुरुपूजन म्हणजेच ध्येय पूजन. गुरुचे जीवन हे ध्येय मूर्तीसारखे असणे आवश्यक असते. मानवाच्या जीवनात ध्येय येताच संयम येतो.अज्ञानाचा अंधःकार निवारण्यासाठी ज्ञानाची ज्योत पेटवणारा गुरु व जीवन विकासाची कामना राखणारा शिष्य यांचा संबध अलौकिक असतो. ज्ञानाचा सूर्य, प्रेमाचा महासागर अशा गुरुचे यादिवशी पूजन करायचे असते. गुरुपूजन म्हणजे सत्याचे पूजन. गुरुपूजन म्हणजे ज्ञानाचे पूजन. गुरुपूजन म्हणजे अनुभवाचे पूजन.... म्हणूनच म्हंटले आहे की " गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः , गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेनमः"