Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

 

Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

  User ID :
 Password :
 forget Password?
  New user? Register

 

VIDEO GALLERY

Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

contact us

 

गो-शाळा

आपल्या संस्कृतीमध्ये गोमातेला अनन्यसाधारण महत्व आहे. वैदिकांच्या यज्ञ संस्थेत गायीला फार महत्व मिळाले होते. प्राचीनकाळी प्रत्येक यज्ञकर्त्या यजमानाची गोशाळा असे व तिच्यात दुभत्या गायी बाळगलेल्या असत. यज्ञाला लागणारे दुध, लोणी व तुप हे गायीचेच असावे लागे. त्यावरूनच पूजा संस्थेतही गायीच्याच दुधा तुपाची आवश्यकता मानली गेली. वेदकाळात गायीला संपत्तीचे स्थान प्राप्त झाले होते.


गाय ही आपल्या हिंदू संस्कृतीचा प्राण आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात चार मातांना मुख्य स्थान आहे. पहिली जन्मदात्री 'जननी', दुसरी 'गोमाता', तिसरी 'भूमाता' आणि चौथी 'जगन्माता (परमेश्वरी)' या चार माता होय. गाईमध्ये तेहत्तीस कोटी देवी-देवतांचे अधिष्ठान आहे. यामुळे गायीची नित्यनियमाने पूजा करणे म्हणजे संपूर्ण देवी-देवतांची पूजा करण्यासारखे आहे. गोपालन, गोसेवा, गोदान, गोरक्षण आपल्या संस्कृतीची महान परंपरा राहिली आहे. गोसेवा सुख आणि समृद्धीचा प्रशस्त मार्ग आहे. हे लक्ष्मीप्राप्ती, विद्याप्राप्ती आणि पुत्रप्राप्तीचे साधन आहे. गोदर्शन, गोस्पर्श, गोपूजन अथवा गोस्मरण यांनी मनुष्याचे सर्व पाप नष्ट होऊन जाते.


"गायीच्या उत्पत्तीची कथा शतपथ ब्राह्मणात पुढील प्रमाणे सांगितली आहे. दक्ष प्रजापतीने प्राणीसृष्टी निर्माण केल्यानंतर थोडे अमृत प्राशन केले. त्या अमृताने तो संतुष्ट झाला. त्यावेळी त्याच्या नाकातून जो श्वास बाहेर पडला, त्याचा सुगंध सर्वत्र दरवळला. त्या श्वासातून एक गाय जन्माला आली. सुगंधातून जन्मल्यामुळे दक्ष प्रजापतीने तिचे नाव सुरभी असे ठेवले. सुरभीपासून अनेक गाई जन्माला आल्या. सुरभी ही गोवंशाची माता ठरली. या सुरभीने एकदा तप आरंभिले. ब्रम्हदेवाने प्रसन्न होऊन सुरभीला अमरत्व व त्रैलोक्याच्या वर असलेला एक स्वर्गही बहाल केला व हा स्वर्ग गोलोक या नावाने ओळखला जातो. या गोलोकातच सुरभी राहते व तिच्या कन्या पृथ्वीवर राहतात."


संदर्भ - भारतीय संस्कृतीकोश


प्रथमपासूनच संस्थेमध्ये आधुनिक स्वरुपाची गो-शाळा असावी अशी इच्छा आहे. यालाच अनुसरून २००० चौ. फुटाची नवीन गोशाळा बांधण्याचा मानस आहे. कार्यप्रेमी व दानशूर मंडळीनी या आधुनिक गोशाळेसाठी जास्तीतजास्त अर्थसहाय्य करावे ही नम्र विनंती.

आपल्याला कोणतीही माहिती अपेक्षित असल्यास ती नि:संकोचपणे कळवावे. दूरध्वनीवरून कार्यासंबधी चौकशी करणाऱ्या कार्यप्रेमी मंडळीनी आपला दूरध्वनी क्रमांक स्मरणपूर्वक सांगावा. विश्वस्त मंडळातील सदस्य सामान्यत: सायं. ६:०० ते ७:०० या वेळेत संस्थेच्या कार्यालयात उपस्थित असतात.